मराठवाड्यातील कलाकारांना साऊथ हिंदी चित्रपटात काम करण्याची लाभली संधी
मराठवाड्यातील कलाकारांना साऊथ हिंदी चित्रपटात काम करण्याची लाभली संधी
राजस्थान मध्ये चित्रित झालेल्या चित्रपटात लातूर, संभाजीनगर, बीडच्या सुपुत्रंची जोरदार कामगिरी.
अहमदपूर (गोविंद काळे) : ४ जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत चालू असलेल्या उदयपूर राजस्थान येथील साऊथ हिंदी चित्रपटात मराठवाड्यातील कलाकारांना काम करण्याची संधी लाभली असून सदरील कलाकारांनी मराठवाड्या सहित पूर्ण महाराष्ट्राचे नावलौकिक केले आहे.
नय्यूम खान फिल्म प्रोडक्शन अंतर्गत दिग्दर्शक बाबू भट्ट यांच्या मार्गदर्शनाने स्टोरीला साजेसे पात्र निवडत असताना लातूर, संभाजीनगर, बीडच्या काही कलाकारांची निवड करण्यात आली.
यात बीड आणि लातूर या दोन्ही ठिकाणी स्थित असलेल्या “रूद्रा मुरकुटे” यांना रामा रेड्डी हे पात्र दिले असून सदरील पात्र हे मुख्य खलनायकाच्या मेन पंटरचे असल्याचे समजते आहे. यात मुख्य खलनायकाची भूमिका साऊथ इंडस्ट्रीचे तसेच बाहुबली भाग पहिला चे खलनायक प्रसिद्ध अभिनेता प्रभाकर कालकेया (निंबा) आहेत. तसेच गोडाळा लातूरचे अजिंक्य मुंडे यांनाही आणि संभाजीनगरचे शंकर (बंडू) खंडागळे, दिपक चौबे, शिवाजी खंदारकर, जयपाल ठाकूर, समाधान बिथरे व बीडचे थोरात महाराज इत्यादी कलाकारांनाही खलनायकाचे पात्र साकरण्याची संधी मिळाली असून आज पर्यंत सदरील कलाकारांनी बरेच मराठी फिल्म्स, ऍड्स, शॉर्ट फिल्म्स तसेच साँग्ज केले असून यावेळी या सर्व कलाकारांना आपल्या कला अनुभवाने तसेच आपल्यातील वैशिष्ट्याने सदरील साऊथ हिंदी चित्रपटात पदार्पण करण्याची नामी संधी लाभली असून त्यांनी या संधीचे सोने केले आहे हे चित्रपट पडद्यावर असल्यास समजणारच आहे.
सदरील चित्रपटाचे नाव सध्या तरी “द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन” असून याचे मुख्य दिग्दर्शक प्रसिद्ध असे बाबू भट्ट आहेत तर त्यांना सोबती म्हणून अनुभवी असलेले लातूरचे दोन भूमी पुत्र सहाय्यक दिग्दर्शक ‘रोहित डावरे’ आणि ‘प्रशांत शिरुरे’ हे यात सहभागी आहेत. चित्रपटाचा निर्माता म्हणून स्वतः मुख्य अभिनेता साहिल (नय्यूम) खान हा प्रमुख भूमिकेत आहे, तर त्याच्या वडिलांचा रोल प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव यांनी साकारला आहे. तसेच हिरोच्या भावाचे पात्र ‘मुकेश भट्ट’ यांनी साकारले असून अभिनेत्री अबोली बागल, मोनिका बंगाळ, रुपाली जाधव, ह्यांनी देखील महाराष्ट्राचे नाव या चित्रपटातून द्विगुणित करण्याचे प्रयत्न केल्याचे समजते आहे.
एकंदरीत काय तर राजस्थान मध्ये जाऊन महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे नाव लौकीक केलेल्या या कलाकारांचे साऊथ हिंदी चित्रपट पदार्पण झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे समजून येत आहे.
