संत ज्ञानेश्वर विद्यालयात महिला मेळावा व तीळगुळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात महिला मेळावा व तीळगुळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात महिला मेळावा व तीळगुळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात महिला मेळावा व तिळगुळाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांची किल्ले बांधणी स्पर्धा,चित्र प्रदर्शन (कलादालन), रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके, माजी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, प्राचार्य शोभा टोम्पे ,डॉ. कामाक्षी पवार, डॉ. वर्षा भोसले, डॉ. नेहा पाटील, इंदुमती जोगदंड सह मुख्याध्यापिक, सहशिक्षिका सह मान्यवरांची उपस्थिती होती.
या सोहळ्याच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा इतिहास कळवा.किल्ल्यांविषयी माहिती व्हावी म्हणून किल्ले बांधणी स्पर्धा, चित्र प्रदर्शन, कलादानंद रांगोळी स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेऊन त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. स्वच्छतेचे आणि वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी उपस्थित असलेल्या महिलांना हँडवॉश आणि ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले.सूत्रसंचालन संगीता आबंदे यांनी तर आभार शारदा तिरूके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!