महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे विमोचन

0
महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे विमोचन

महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे विमोचन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत असून, शैक्षणिक वर्ष २०२४- २५ हे वर्ष महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, रौप्य महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंग पाटील एकंबेकर यांच्या शुभहस्ते रौप्य महोत्सवी बोधचिन्हाचे विमोचन नुकतेच करण्यात आले. यावेळी सचिव पी.टी शिंदे,उपजिल्हाधिकारी डॉ. मंजुषा लटपटे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी आदींची उपस्थिती होती.
किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महात्मा फुले महाविद्यालयाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘फुले पॅटर्न’ निर्माण केला असून, अहमदपूरला शिक्षणाचे गतवैभव प्राप्त करून देण्याचे कार्य यशस्वीरित्या केले आहे.
महात्मा फुले महाविद्यालयाने २५ वर्षाच्या कालावधीमध्ये शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळविला असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुणवत्ता संपादन करणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने महात्मा फुले महाविद्यालयाला शैक्षणिक ऑडिटमध्ये ‘ए ग्रेड ‘ दिला असून, यूजीसीच्या नॅक कमिटी कडूनही महाविद्यालयाला २.७० सीजीपीए सह ‘बी प्लस ‘ दर्जा प्राप्त झाला आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले होते. त्याचबरोबर दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ही करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांची रेलचेल या शैक्षणिक वर्षात होणार आहे याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या उत्साहात रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करीत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!