अहमदपूर येथील डॉ. मजगे यांनी देवदुत बनुन वाचवले कुंभमेळ्यातील भाविकांचे प्राण…

0
अहमदपूर येथील डॉ. मजगे यांनी देवदुत बनुन वाचवले कुंभमेळ्यातील भाविकांचे प्राण…

अहमदपूर येथील डॉ. मजगे यांनी देवदुत बनुन वाचवले कुंभमेळ्यातील भाविकांचे प्राण…अहमदपूर येथील डॉ. मजगे यांनी देवदुत बनुन वाचवले कुंभमेळ्यातील भाविकांचे प्राण…

त्रिवेणी संगमावर बेशुद्ध अवस्थेत पाण्यात जात होता वाहून..
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील काही भाविकांची टीम सध्या कुंभमेळ्यासाठी गेली आहे ते दिनांक तीन फेब्रुवारी रोजी त्रिवेणी संगम येथे स्नान करत असताना त्यांच्या पासून काही अंतरावरून एक व्यक्ती वाहत जात असताना या ग्रुपमधील संजय गोटमवाड यांनी पाहिले तो व्यक्ती वाहत नावे खाली जात होता मात्र त्यांनी त्याला पाहताच त्याच्यापर्यंत जाऊन त्याला ओढून कडेला आणले व त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर निलेश मजगे यांना ताबडतोब बोलवून त्यास पहावयास सांगितले..
तो भाविक व्यक्ती डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार टंग बाईट होऊन व फेपरे येऊन बेशुद्ध झाला होता.
त्याला लागलीच डॉक्टर निलेश मजगे यांनी सीपीआर दिला त्याच्या तोंडातील संपूर्ण लाळ बाहेर काढली व त्यांच्या वैद्यकीय कौशल्यानुसार त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यास शुद्धीवर आणले. त्यानंतर तो व्यक्ती बरा झाला व त्यास पुढे उपचारासाठी पाठवण्यात आले.

तो व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आणखीन काही मिनिटे पाण्याखाली राहिला असता तर निश्चितच दगावला असता.
अहमदपूर येथील कुंभमेळ्यासाठी गेलेल्या मधील संजय गौतमवाड यांनी दाखवलेली सजगता व डॉक्टर निलेश मजगे यांनी केलेले प्राथमिक उपचार यामुळे त्या भाविकांचे प्राण वाचू शकले आहेत.
संजय गोटमवाड व डॉक्टर निलेश मजगे यांनी तत्परता दाखवून त्या व्यक्तीवर केलेल्या उपचाराबद्दल व त्या भाविकांचे प्राण वाचल्यामुळे अहमदपूर परिसरात त्यांचे कौतुक होत आहे व त्यांचे अभिनंदनही करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!