जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा प्रथम क्रमांक

0
जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा प्रथम क्रमांक

जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा प्रथम क्रमांक

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी पत्रकार संघ किनगाव च्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धेत अहमदपूर च्या संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपली नेत्र दीपक यशाची परंपरा कायम केली आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले .यात प्रथम पारितोषिक 11,000 रू. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, पुष्पहार देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.


यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेटीबा शृंगारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस साजिद भाई सय्यद , उद्योजक नरहरी मुरकुटे, उद्योजक संगमेश्वर किनकर,कृष्ण अर्जुन टेक्स्टाईल ग्रुपचे व्यंकटराव बोडके, रिपाई चे जिल्हाध्यक्ष सुनील वाहुळे माजी उपसरपंच याकुब शेख आदी सह मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सहशिक्षक युवराज मोरे यांनी केले. या यशाबद्दल श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, सचिव तथा प्राचार्या रेखाताई तरडे, उपाध्यक्षा एडवोकेट मानसीताई हाके पाटील, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!