हळदी कुंकवा निमित्त शाळेत भरला महिलांचा मेळावा

0
हळदी कुंकवा निमित्त शाळेत भरला महिलांचा मेळावा

हळदी कुंकवा निमित्त शाळेत भरला महिलांचा मेळावा

अहमदपूर‌ (गोविंद काळे) : येथील नूतन मराठी प्राथमिक शाळेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिताताई आबासाहेब देशमुख व उद्घाटक सौ. रूपालीताई अक्षय भैय्या देशमुख या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करून एकमेकांना हळदीकुंकू देण्यात आले .तसेच यावेळी गटसाधन केंद्रातील विषय तज्ज्ञ डॉ. कामाक्षी पवार व जोगदंड मॅडम उपस्थित होत्या. यावेळी सर्व महिला अतिशय आनंदाने सहभागी झाल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलावार मॅडम यांनी केले. यावेळी करण्यात आलेल्या सरस्वती मातेच्या स्थापनेने सर्वांना मोहित केले. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम तसेच पोलावर मॅडम, बेंबळे मॅडम, बिरादार मॅडम ,भगत मॅडम, कुलकर्णी मॅडम, देशमुख मॅडम यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुठ्ठेवाड सर ,उप्परवाड सर, कोतलापुरे सर यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब देशमुख तसेच अक्षय भैय्या देशमुख यांनी अभिनंदन केले तर आभार शोभा पोलावार यानी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!