अहमदपूर येथील बालाजी मंदिरातील दान पेटीतीलअंदाजे 35000 रुपये चोरट्यांनी केली लंपास

0
अहमदपूर येथील बालाजी मंदिरातील दान पेटीतीलअंदाजे 35000 रुपये चोरट्यांनी केली लंपास

अहमदपूर येथील बालाजी मंदिरातील दान पेटीतीलअंदाजे 35000 रुपये चोरट्यांनी केली लंपास

अहमदपूर (प्रतिनिधी) शहरातील गाव भागात असलेल्या मारवाडीगल्ली येथील प्राचीन बालाजी मंदिररात दि-3-2-24 वार सोमवार मध्यरात्री च्या सुमारास मंदिरातील आतील उजव्या बाजूचे खिडकी तोडून आत जाऊन कोणीतरी अज्ञात इसमानी मंदिरातील दोन दानपेट्या फोडून दानपेटी मधील रोख रक्कम अंदाजे 35 हजार रुपये रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अहमदपूर शहरात घडली असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तरी चोरी करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की विनोदकुमार वल्लभदास भूतडा राहणार गुणाले गल्ली अहमदपूर पोलिसांना दिलेल्या तक्रारीवर सांगितले आहे की दि 4-2-25 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या गुणाले गल्ली येथील घरी असताना मला श्री बालाजी मंदिराची पुजारी भोलाप्रसाद पांडे यांचा फोन आला की श्री बालाजी मंदिरांमधील दानपेटी कोणीतरी फोडली आहे व आतील पैसे चोरून नेले आहे तरी तुम्ही लवकरात लवकर मंदिरामध्ये या असे सांगितले मी व आमचे मंदिराचे ट्रस्टी, पंच कमिटी यांनी मंदिराची पाहणी केली असता मंदिरातील आतील उजव्या बाजूचे खिडकी तोडून आत जाऊन कुणीतरी अज्ञात इसमानी मंदिरातील दोन दानपेटी फोडून आतील अंदाजे 35 हजार रुपये रक्कम चोरून नेले आहे तरी चोरी करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध दि -4-2-25 वार मंगळवार रोजी भारतीय न्याय संहिता ( बि.एन.एस ) 2O23 कलम 3O5 (e ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरी व घरफोडी करण्याचे प्रमाण वाढले असून त्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिका मधून होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!