जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने 2100 विद्यार्थ्याकडून सामूहिक सूर्यनमस्काराचे सादरीकरण

0
जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने 2100 विद्यार्थ्याकडून सामूहिक सूर्यनमस्काराचे सादरीकरण

जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने 2100 विद्यार्थ्याकडून सामूहिक सूर्यनमस्काराचे सादरीकरण

उदगीर (एल.पी.उगीले) : जेष्ठ नागरिक संघ व पतंजली योग समिती उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जागतिक सूर्यनमस्कार अविष्कार दिन रथसप्तमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गेल्या वीस वर्षापासुन या दोन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाचे प्रणेते स्व. डॉ.प्रकाशराव देशपांडे यांनी हा उपक्रम सुरू केलेला होता .
आज या कार्यक्रमात ३२ शाळांनी सहभाग घेतला . वास्तविक पाहता सूर्यनमस्कार हा एक खूपच चांगला शारीरिक आरोग्यासाठी उपयोगी असा व्यायामाचा प्रकार आहे. यामध्ये असणाऱ्या बारा स्टेप्स, त्यातील सर्व आसने शरीराच्या प्रत्येक अवयवांना मिळणारा व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. भावी पिढीचे आरोग्य निरोगी व्हावे, प्राचीन भारतीय सनातन संस्कृतीचा हा अनमोल ठेवा आपल्या पुढील पिढीला मिळावा. यासाठी या दोन्ही संघटना हा उपक्रम घेतात. प्रत्येक बालकाचे आरोग्य चांगले असावे, त्यांचे भावी जीवन चांगले जावे, कारण ही मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. देशाचे आधारस्तंभ आहेत. “सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते”या न्यायानुसार आपली सामाजिक बांधिलकी समजून यामध्ये दोन्ही संघटना कार्यरत असतात. दि.4 फेब्रुवारी 2025 रथसप्तमी वार मंगळवार या दिवशी जिल्हा परिषदेच्या मैदानावर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मनोज भाऊ पुदाले, रतीकांत अंबेसंगे , प्रा.बसवलिंग गारठे,अनिलजी पत्तेवार , उमाकांत अंबेसंगे, पंतजली महाराष्ट्र राज्यप्रभारी अनिल अमृतवार,सह राज्यप्रभारी शिवाजीराव शिंदे, मुरलीधर जाधव, प्रमोद कुलकर्णी ,शिवमुर्ती भातंबरे, सुरेन्द्र अक्कनगीरे , नरेंद्र यंदे , शिवकुमार शिरगिरे,भुसागरे,डॉ नारायण जाधव, हणमंतराव औरादे, डॉ. एकुंडे,पत्रकार व्ही.एस.कुलकर्णी , श्रीमती सुमति भातांबरे ,सौ पौद्दार ताई , सौ. चंद्रकला ताई बिरादार
ईत्यादी योग शिक्षक,योगसाधक, योग शिक्षिका , प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनें उपस्थित होते.
या वेळी सौ.मीनाक्षी स्वामी राज्यसंवाद प्रभारी, सौ.कलावती भातांबरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राजु दासरवाड यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक केले तसेच प्रा श्रीराम चामले यांनी मंत्रोच्चार केले. प्रा.श्रीराम चामले यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले तर प्रा. डॉ. नरेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. मुरलीधर जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!