श्री हावगीस्वामीच्या रासेयो शिबिराचा होनाळी येथे समारोप

0
श्री हावगीस्वामीच्या रासेयो शिबिराचा होनाळी येथे समारोप

श्री हावगीस्वामीच्या रासेयो शिबिराचा होनाळी येथे समारोप

उदगीर (एल.पी.उगीले) : श्री हावगीस्वामी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा समारोप मौजे होनाळी ता. देवणी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव उमेश पाटील देवणीकर , प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, गटविकास अधिकारी सागर वरंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके तर मंचावर औदुंबर पांचाळ उपसरपंच, शिवाजी बिरादार, गोडबोले अशोक, व्यंकट बिरादार, दिलीप बिरादार, शेख इस्माईल, विलास घंटे, मुख्याध्यापक राजवाडे ,प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर, उपप्राचार्य डॉ. ए.ए.काळगापुरे उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीताने जि.प.प्रशालेतील कु. गायकवाड श्रुती आणि तिच्या मैत्रिणींनी केले. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.एस.आर. अनकल्ले, पाहुण्यांचा परिचय कार्यक्रमाधिकारी प्रा.डी.व्ही.बंडे यांनी करून दिला.
उत्कृष्ट स्वयंसेवक सुवर्णकार श्रीकांत, हर्ष कपाळे ,दुवे अक्षय व उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून बिरादार शुभांगी ,सय्यद सादिया यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी उमेश पाटील देवणीकर यांच्याकडून जि.प.शाळेस चार व्हाईट बोर्ड मुख्याध्यापक राजवाडे यांना देण्यात आले. याप्रसंगी आडे सुमित, दुवे अक्षय , जिया बदलानी या विद्यार्थ्यांने मनोगत व्यक्त केले. शहीद गोपाळ गिरी स्मारकामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

गावकऱ्यांतर्फे औदुंबर पांचाळ उपसरपंच यांनी कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवकांचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे माणिक डोके यांनी विद्यार्थ्यांना आपण जबाबदार नागरिक म्हणून पदार्पण करीत आहात. उद्याचा महाराष्ट्र भक्कम सुदृढ करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी पुढे यायला पाहिजे. आपले उद्याचे भविष्य नक्कीच उज्वल आहे. देशाचा नावलौकिक करताना आव्हानांना न घाबरता आपण सामोरे गेले पाहिज, असे मत व्यक्त केले. तसेच सायबर गुन्हे, रोड एक्सीडेंट यावरही भाष्य केले.
उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही समाजाचा विचार करण्याची शिकवण देते. माझ्यासाठी नव्हे तर तुझ्यासाठी हा विचार खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमधून दिला जातो.इ.स.२०४७ पर्यंत मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित राष्ट्र करण्याचे करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे.

अध्यक्षीय समारोप करताना उमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांची नाळ ग्रामीण भागाशी जोडली गेली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेमधून वैयक्तिक विकासा सोबतच सामाजिक विकासही झाला पाहिजे आणि आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी एक आदर्श नागरिक बनून या समाजाच्या विकासा साठी धडपड करेल.आपण ग्रामीण भागामध्ये विकासासाठी राबले पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात पुढाकार घेऊन गावे स्वयंपूर्ण केली पाहिजेत असे मत मांडले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद सादिया तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ.एस.डी.लोहारे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!