संगीता नेत्रगावे शिवशंभू गौरव पुरस्काराने सन्मानित

0
संगीता नेत्रगावे शिवशंभू गौरव पुरस्काराने सन्मानित

संगीता नेत्रगावे शिवशंभू गौरव पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) : संगीता नेत्रगावे या सामाजिक, महिला विकास व सहकार्य तथा शैक्षणिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करणारे एक दिलदार व्यक्तीमत्व आहे. तसेच संगीता दिपक नेत्रगावे गेल्या दहा वर्षांपासून उदगीर नगरीत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. तसेच त्या आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांचे सन्मानित झाल्या आहेत.
त्यांचे सामाजिक, महिला विकास व शैक्षणिक कार्यातील योगदान यांची दखल घेऊन शिवशंभू गौरव पुरस्कार देऊन संभाजीनगर येथे त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. संगीता दिपक नेत्रगावे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी फायद्याचे झाले आहे.
गोरगरीब विद्यार्थ्यांना ते नेहमीच सहकार्य करत असतात. सध्या संगीता दीपक नेत्रगावे या महात्मा पब्लिक स्कूलच्या संचालिका आहेत.
या शाळेच्या माध्यमातून तब्बल नऊ वर्षांपासून संगीता नेत्रगावे यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहकार्य करण्याचे काम केले आहे.
कोरोनाच्या भिषण काळात गरजवंत लोकांना त्यांनी केलेली मदत कौतुकास्पद होती. उदयगिरी लायन्स दवाखान्यात डॉक्टरांना पि पि इटी किट वाटप करण्यात आले होते. तथा तेथील पेशंटना त्यांनी अन्न व ब्लॅकेंट देऊन मदत केली. तसेच त्यांनी काही गोरगरीब लोकांच्या आपरेशनसाठी मदत केली असून
डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी अनेक पेशंटना मदत केली. तसेच कोरोना काळात त्यांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना सॅनेटाईजर व मास्क वाटप केलेले आहेत.निडेबन गावात अंगणवाडी विद्यार्थ्यांना फळे व पोषक आहार वाटप करण्यात आले होते.
रोटी,कपडा बँकेत बायकांना साड्या वाटप करून हातभार लावला होता.
महिलांना वेगवेगळ्या कार्यक्रमांतून मदत करुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांनी केलेल्या मदतीमुळे अनेक महिलांना आधार मिळाला. त्यांना शिवशंभू गौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अविरतपणे चालू राहील्यामुळे अनेकांना त्या हल्ली आधारस्तंभ वाटत असतात.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!