उदयगिरीत लोकप्रशासन विषयाची विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

0
उदयगिरीत लोकप्रशासन विषयाची विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

उदयगिरीत लोकप्रशासन विषयाची विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात लोकप्रशासन विभागाच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण – 2020 नुसार बी.ए. द्वितीय वर्ष लोकप्रशासन विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत नवीन अभ्यासक्रमावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे लोकप्रशासन अभ्यास मंडळ व विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्यात विचारमंथन होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 8 फेब्रुवारी 2025 वार शनिवार रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यशाळेत लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यातील लोकप्रशासन विषयाचे सर्व प्राध्यापक व अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, सदस्य सहभागी होणार आहेत. कार्यशाळेचे उद्घाटन बसवराज पाटील नागराळकर यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुशीलादेवी महाविद्यालय, लातूर येथील प्राचार्य डॉ. अजय पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संतराम मुंडे, लोकप्रशासन अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. एम. आय. शेख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. पंचशील एकंबेकर हे असणार आहेत. या कार्यशाळेसाठी लोकप्रशासन विषयाचे प्राध्यापक, संशोधक व अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, कार्यशाळा समन्वयक डॉ. गौरव जेवळीकर, सह-समन्वयक प्रा. संजय बिबीनवरे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!