समाजपरिवर्तनासाठी राष्ट्रीय सेवा योजना आवश्यक – प्रा. शिवकुमार उस्तुर्गे

0
समाजपरिवर्तनासाठी राष्ट्रीय सेवा योजना आवश्यक - प्रा. शिवकुमार उस्तुर्गे

समाजपरिवर्तनासाठी राष्ट्रीय सेवा योजना आवश्यक - प्रा. शिवकुमार उस्तुर्गे

उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये सामाजिक समता, न्याय, बंधुत्व, राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्तीचे शिक्षण दिले जाते.तरूणांनी समाज परिवर्तनासाठी पुढाकार घेऊन नेतृत्व केले पाहिजे.राष्ट्रीय सेवा योजनेतून समाजातील अज्ञान ,अंधश्रद्धा निर्मूलन, लोकसंख्या नियंत्रण, स्वच्छता,बालविवाह ,हुंडाप्रथा निर्मूलनासाठी सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात सविस्तर माहिती देऊन याची उकल करण्याचे धडे देणारे सातदिवसीय उद्बोधन वर्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर असते.
समाजपरिवर्तनासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वाची भूमिका बजावते असे मत श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या विशेष शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा शिवकुमार उस्तुर्गे होनाळी ता.देवणी येथे बौद्धिक सत्रात व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा वीरभद्र बिरादार हे उपस्थित होते.विचारपीठावर वैद्यकीय अधिकारी डॉ कालिदास बिरादार, प्रा.डॉ.विष्णू कांबळे प्रा.डाॅ. सुशीलप्रकाश चिमोरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ कालिदास बिरादार यांनी मानवी जीवनात चांगले आरोग्याला अधिक महत्त्व असते. युवकांचे आरोग्य चांगले म्हणजे त्या राष्ट्राचे आरोग्यही चांगले असते असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ विष्णू कांबळे यांनी नशाबंदी मानवी जीवनात आवश्यक असते.नसेमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते.त्याच्या दुष्परिणामाची जाणीव जागृती समाजात करुन देण्याची सर्वस्व जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची असल्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.डाॅ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी संत साहित्य आणि पर्यावरण या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप प्रा. वीरभद्र बिरादार यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे गीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असल्याची जाणीव करून दिली.राष्ट्रीय सेवा योजनो शिबिर हे उत्तम माणूस घडविण्याचे प्रशिक्षण असते,असे ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.धनराज बंडे, डॉ विठ्ठल गोरे,प्रा.संतोष पोतरे,प्रा.संतोष अनकल्ले,श्री राहूल कांबळे आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक हर्ष कपाळे यांनी केले तर आभार स्वयंसेवक स्वप्निल भालके यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!