संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालय, उदगीर या शाळेचे नयनरम्य वार्षिक बाल स्नेह संमेलन संपन्न
संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालय, उदगीर या शाळेचे नयनरम्य वार्षिक बाल स्नेह संमेलन संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील मराठी, सेमी माध्यमाची नामांकित शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालय, उदगीर, या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास झाला पाहिजे यासाठी विशेष परिश्रम घेतले जातात. विद्यार्थी परिपूर्ण घडलेच पाहिजेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी वार्षिक बालस्नेहसंमेलन घेण्यात येते, या वर्षी शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ते आणखीनच विशेष ठरले.
हा कार्यक्रम शासकीय दूध योजना च्या परिसरामध्ये घेण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन मोठेवाड हे होते, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडामंत्री व युवक कल्याण मंत्री आ. संजय बनसोडे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मनोज दादा पुदाले, उदगीर शहर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे,सौ दिपालीताई औटे, उदय भाऊ मुंडकर, अनिल भाऊ मुदाळे, सय्यद जनिमिया, प्राध्यापक चंद्रसेन मोहिते , रवींद्र अंबुलगे महाराज, संस्थेचे अध्यक्ष गोविंदरावजी नीटुरे, सचिव वसुंधराताई निटूरे, सहसचिव अमोल निटुरे, नंदनी ताई निटूरे, मुख्याध्यापिका सौ जगताप अनिता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झाले.
