महादेव मंदिर ते नेहरू नगर देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता मोकळा करा – नागरिकांची मागणी

0
महादेव मंदिर ते नेहरू नगर देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता मोकळा करा - नागरिकांची मागणी

महादेव मंदिर ते नेहरू नगर देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता मोकळा करा - नागरिकांची मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) : शहरातील जळकोट रोड ते महादेव मंदिर, देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन शासकीय पाणंद रस्ता खुला करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे, जळकोट रोड ते महादेव मंदिर पर्यंतचा रस्ता खुला करण्यात आला, परंतु महादेव मंदिर ते आयटीआय कॉलेजच्या पाठीमागून जाणारा पाणंद रस्ता खुला करून द्यावा. अशी मागणी ३० ऑगस्ट २०२१ व ४ ऑक्टोबर २०२१ व २८ जानेवारी २०२५ रोजी निवेदन देऊन करण्यात आली होती,२ नोव्हेंबर २०२१ रोजी उपोषणही करण्यात आले होते, परंतु आजपर्यंत पाणंद रस्ता खुला करण्यात आलेला नाही, महादेव मंदिर ते देगलूर रोड, नेहरू नगर पर्यंतचा निजामकालीन पाणंद रस्ता खुला करून द्यावा. अन्यथा १० फेब्रुवारी पासून न्याय मागणीसाठी साखळी उपोषण करू. असा इशारा उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!