शिवाजी महाविद्यालयाचा स्वारातीम विद्यापीठाकडून विविध पारितोषिकांनी सन्मान
शिवाजी महाविद्यालयाचा स्वारातीम विद्यापीठाकडून विविध पारितोषिकांनी सन्मान
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयाने विविध क्षेत्रांमध्ये आपले नावलौकिक केलेले आहे. नुकताच नॅक मूल्यांकनाचा ए प्लस दर्जा प्राप्त केलेला आहे. शैक्षणिक,सामाजिक, साहित्यिक, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, क्रीडाविषयक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये महाविद्यालय अग्रेसर असते. उन्हाळी 2024 च्या परीक्षेत बीएससीचे विद्यार्थी विद्यापीठातून सर्वप्रथम, द्वितीय आणि तृतीय आले. यामध्ये बिरादार नंदिनी वसंत ही बॉटनी विषयात सर्वप्रथम, मायक्रो बायोलॉजी विषयास सर्वप्रथम येऊन दुहेरी सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर कोयले मनश्री द्वितीय व मुंडे मृण्मयी तृतीय आली. एम कॉम ची विद्यार्थिनी तनुजा तेगमपुरे ही विद्यापीठातून सर्वप्रथम आली. वैष्णवी श्रीकांत पाटील हिने युवक व क्रीडा मंत्रालय भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 या स्पर्धेत संपूर्ण भारत देशातून तीस लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात सहभागी झाली. भारत मंडपम दिल्ली येथील बहुस्तरीय निवड प्रक्रियेतून संपूर्ण भारत देशातून तिची निवड झाली. विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.बालाजी सूर्यवंशी यांची विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून निवड झाली त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला . दरवर्षी महाविद्यालय किसान वार्षिक अंक काढत असते. किसान वार्षिक अंकास 2023-24 चे विद्यापीठ स्तरावरील उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले ते कार्यकारी संपादक डॉ.नरसिंग कदम यांनी स्वीकारले. महाविद्यालयाने अशा विविध क्षेत्रात विद्यापीठ स्तरावर नावलौकिक मिळवून पारितोषिक संपादन केल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर,सचिव पी.टी.शिंदे ,सर्व कार्यकारणी सदस्य, प्र. प्राचार्य डॉ.मांजरे आर.एम., प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
