श्यामार्य कन्या विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

0
श्यामार्य कन्या विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

श्यामार्य कन्या विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामार्य कन्या विद्यालयात दहावीच्या विद्याथ्यांनी स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वयंशासन दिनानिमित्त मुख्याध्यापिकेच्या भूमिकेत वैष्णवी सूर्यवंशी तर पर्यवेक्षिकाच्या भूमिकेत ऋतुजा परगे या मुलींनी कार्य केले. इयत्ता दहावी मधील 50 विद्यार्थिनींनी शिक्षिका म्हणून भूमिका बजावली. त्या सर्व मुलींना वर्ग पाचवी ते नववीचे वेळापत्रक देण्यात आलेले होते. या वेळापत्रकानुसार सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षिका
अध्यापनाचा एक नवीन अनुभव आज घेतला.संपूर्ण एक दिवस शाळा चालवण्याची जबाबदारी या सर्व विद्यार्थिनींनी स्वीकारलेली होती. सर्व विद्यार्थिनींनी साडीच्या वेशभूषेमध्ये शालेय वेळेत उपस्थित होते. या सर्व विद्यार्थिनींना शिक्षकांनी सोपवून दिलेल्या वर्ग विषयानुसार अध्यापनाचे कार्य उत्साहाने पूर्ण केले. सुहाना शेख, स्नेहा लांडगे, ज्ञानेश्वरी पाटील, अनुराधा पाटील, स्नेहा गुळंगे ,संस्कृती मुत्तेपवार ,तनुश्री मुत्तेपवार, नंदिनी नवटक्के, ईश्वरी बिरादार या मुलींनी अध्यापनाचे उत्तम कार्य केले.
सुहाना शेख, ज्ञानेश्वरी बिरादार, दिव्या कांबळे, स्वराला कोकलगावे, चैतन्य बुके, स्नेहा लांडगे, ऋतुजा परगे, वैष्णवी सूर्यवंशी या मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले.
आढावा बैठकीमध्ये श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक प्रवीण भोळे, पर्यवेक्षक विजय बैले यांनी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षिकांचे अभिनंदन केले. संस्थाअध्यक्ष सुपोषपाणी आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर, सचिव विक्रम संकाये सहसचिव अंजुमनताई आर्य या सर्व संस्था पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन तिवारी, मीनाक्षी ऐनिले सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!