लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अंगी खिलाडूवृत्ती व नेतृत्वाचे गूण विकसित व्हावेत म्हणून शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून शालेय समिती व्यंकटराव गुरमे, अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व संमेलन सहप्रमुख बळवंत देशमुख उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
श्याम गौंडगावे यांनी विविध क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांची चांगली जडणघडण होत असते.त्यांच्या अंगी खिलाडूवृत्ती या गुणांची जोपासना होते,असे सांगितले.
क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत सर्वच विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यश संपादन करावे.खेळात हार जीत होतच असते.निराश न होता पुन्हा यश मिळवण्यासाठी सज्ज व्हायचे असते.असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांच्या हस्ते कबड्डीच्या मैदानावर श्रीफळ फोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.याप्रसंगी मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार,संमेलन सहप्रमुख बळवंत देशमुख व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचलन श्याम गौंडगावे यांनी केले.
