महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उदगीरच्या अध्यक्षपदी डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उदगीरच्या अध्यक्षपदी डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांची बिनविरोध निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सर्व संमतीने डॉ. रामप्रसाद लखोटिया यांची उदगीर शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये उपाध्यक्ष प्रा. बाबुराव माशाळकर आणि प्राचार्य दत्ता पाटील तसेच कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील, प्रधान सचिव डॉ बळीराम संभाजी बुक्तरे यांचीही निवड करण्यात आली. ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे गुरुजी यांची लातूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीत मधुकरराव एकुरकेकर मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ज्योती डोळे यांची कविता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी बुवाबाजी संघर्ष विभाग- कार्यवाह सुभाष तगाळे, विविध उपक्रम विभाग- श्रावण गुंडाप्पा बागबंदे, शिरीष रोडगे वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प विभाग -विजयकुमार निडवंचे, महिला सहभाग -ज्योती डोळे, डॉ. अर्चना मोरे युवा सहभाग- श्रीनिवास एकुरकेकर, अग्रिता विश्वनाथे, जातीअंत संकल्प विभाग- कांता कलबुर्गे, जोडीदाराची विवेकी निवड विभाग -योगेश बिरादार, जात पंचायत मूठ माती अभियान- प्रीतम सूर्यवंशी, आंतरजातीय सत्यशोधकी विभाग- विजयकुमार बिरादार, प्रशिक्षण व्यवस्थापन -सिद्धेश्वर लांडगे, विवेक जागर प्रकाशन वितरण- पी एस कुलकर्णी, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका वितरण- अंबादास आलमखाने, मानसिक आरोग्य व्यवस्थापन- पांडुरंग बोडके, विज्ञान बोधवाहिनी -प्रा. गोपाळ पाटील, सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग- प्रा. बालाजी सूर्यवंशी, सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग- रोहित बिरादार, निधी व्यवस्थापन विभाग- हनुमंत गोळा, कायदेविषयक व्यवस्थापन -महेश मळगे, अँड विजयकुम कुमार बिरादार, दस्तावेज संकलन विभाग- बाबुराव वाघमारे, विवेक वाहिनी विभाग- डॉ ज्योती संपाळे, राष्ट्रीय समन्वय- विभाग दत्ता हरी होनराव, डॉ म. ई. तगावार यांची निवड करण्यात आली आहे.
