प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला स्वयंशासन दिनाचा आनंद
प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला स्वयंशासन दिनाचा आनंद
मुरूम (एल.पी.उगीले) : उमरगा तालुक्यातील भुसणी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन हा उपक्रम शिस्तबद्ध आणि खेळीमेळीत वातावरणात साजरा करण्यात आला. या दिनी विद्यार्थ्यांनी शालेय प्रशासनाचा अनुभव तर घेतलाच पण शिक्षक म्हणून अध्यापन करत विद्यार्थ्यांसमोर प्रत्येक शब्द किती जबाबदारीने वापरावा लागतो. हा अनुभव ही तितकाच महत्त्वाचा ठरला, असे मनोगत शिक्षक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. आजचा हा अनोखा अनुभव देणाऱ्या आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरणार असल्याचा अनुभव व आनंद विद्यार्थ्यांनी शिक्षक या नात्याने व्यक्त केला. स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका म्हणून कुमारी श्रुती बनसोडे, उपमुख्याध्यापक कुमारी सानिया मुल्ला यांनी काम पाहिले. विद्यार्थी शिक्षक म्हणून प्रशालेतील कुमारी नंदिनी गाडेकर, अनुराधा हिरमुखे, छकुली हिरमुखे, संचिता पाटील, प्रियंका घोडके, लक्ष्मी जामगे, मनीषा कांबळे, स्वाती स्वामी, सौदर्य बनसोडे, जोया पटेल, वैष्णवी पारधे, बर्गलसिद्ध बनसोडे, रोहित गायकवाड, तुकाराम सोनटक्के, रूपाली संगसट्टे, महादेव व्हनाजे, रणजीत घोडके, रत्नदीप गायकवाड, राहुल बिराजदार, दर्शन जमादार, संकेत माळी या विद्यार्थ्यांनी काम पाहिले. नववीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आजच्या शिस्तबद्ध आयोजनाबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेस डायस सप्रेम भेट दिला. प्रशालेतील सहशिक्षक प्रेमनाथ आमचे, संजीव सकपाळे, महेंद्र गायकवाड, जमीर मुजावर, सोनाली काळे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाराणी हिरेमठ तर आभार माया गायकवाड हिने मानले.
