चौबारा रोड येथील संग्राम शाळेत आरोग्य शिबिराचे नियोजन
चौबारा रोड येथील संग्राम शाळेत आरोग्य शिबिराचे नियोजन
उदगीर (एल.पी.उगीले) : नागरी प्राथमिक आरोग्य, तळवेस उदगीर व मधुर डायबिटीज सुपर स्पेशालिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने संग्राम माध्यमिक विद्यालय, चौबारा रोड उदगीर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 66 जणांची मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. तसेच वेगवेगळ्या आजारावर मार्गदर्शन करून मोफत औषधे वाटप करण्यात आले. मधुर डायबिटीज सेंटरचे डॉ.प्रशांत नवटक्के यांनी मधुमेह व रक्तदाब कसे नियंत्रणात ठेवायचे? यावर मार्गदर्शन केले.यावेळी ए एन एम आरोग्य सेविका पाटील एस आर, गुंठे एस आर, केंद्रे पी बी, कापडे, बिरादार एस आर, पांचाळ एस आर,पुटेवाड टी.व्ही.फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन योगेश, शेख एन एस, खडके एम बी यांनी मदत केली. तसेच मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी स्वप्निल फुलारी, नवीन श्रृंगारे यांनी केली. या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना खूप फायदा झाल्याचे नागरिक बोलत आहेत.
