राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश संघटक सचिवपदी भरत चामले यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश संघटक सचिवपदी भरत चामले यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश संघटक सचिवपदी भरत तुकाराम चामले यांची निवड करण्यात आली ,भरत तुकाराम चामले हे पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे निष्ठावंत व निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. अत्यंत संघटन कुशल आणि शेतकऱ्यांचे हित जोपासत शेतकऱ्यांसाठी लोककल्याणकारी योजना प्रत्यक्ष राबवून ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणारे नेते म्हणून ती ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघावर संचालक म्हणून मराठवाडा विभागातून बिनविरोध निवड व्हावी यासाठी अजितदादा पवार यांनी प्रयत्न केले होते. भरत चामले त्यांचे समाजातील सर्वच घटकांसोबत सलोख्याची संबंध आहेत. त्यांची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नाळ जोडलेले आहे.याची दखल घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई येथे निवड करण्यात आली, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार शिवाजीराव गर्जे , माजी मंत्री आ .संजयजी बनसोडे , पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे,पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजयजी बोरगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

चौकट
भरत चांगले उत्कृष्ट काम करतील – ना. अजित दादा पवार
उदगीर येथील स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरत चामले यांच्या संघटन कुशल नेतृत्वाचा कस आता राज्य पातळीवर लागणार आहे. पक्ष संघटन बांधणीमध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांचे आजपर्यंतचे योगदान विचारात घेऊन त्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. एकूण भरत चामले यांच्या आज पर्यंतच्या कामाची दखल आणि कार्यकर्ते हाताळण्याची सचोटी विचारात घेऊन प्रदेश कार्यकारणीवर त्यांना पद देण्यात आले आहे. ही मोठी जबाबदारी असून ती यशस्वीपणे भरत चामले पार पाडतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला आहे. भरत चामले यांना शुभेच्छा देऊन त्यांच्याकडून अपेक्षाही पक्षश्रेष्ठींनी वक्त केल्या आहेत.
चौकट
पक्षश्रेष्ठीचा विश्वास सार्थ ठरवेन – भरत चामले
माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातील कार्यकर्त्यावर पक्षश्रेष्ठींनी एवढा मोठा विश्वास दाखवून, प्रदेश कार्यकारणीवर काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने करने गरजेचे आहे. पक्षामध्ये प्रामाणिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करून पक्ष संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवणार. असे विचार या निवडीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भरत चामले यांनी व्यक्त केले आहेत.
