सायकलिंग ग्रुपच्या सदस्यांचा भाजपच्या वतीने सत्कार
सायकलिंग ग्रुपच्या सदस्यांचा भाजपच्या वतीने सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर ते अयोध्या असा सायकलवर प्रवास करून येणाऱ्या उदगीर येथील सायकलिंग ग्रुपच्या सर्व सदस्यांचा उदगीर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी उदगीर ते अयोध्या पर्यंत सायकल वर प्रवास करून येणाऱ्या सर्व सायकलस्वारांचे कौतुक करीत दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन हे सायकलस्वार देशाच्या विविध भागात जाऊन येतात, हे उल्लेखनीय असल्याचे सांगितले. या सायकलस्वारांमुळे उदगीरचे नाव देशभरात जात असल्याचे गौरवोद्गार यावेळी बागबंदे यांनी काढले.
यावेळी दत्ताजी पाटील, आनंद बुंदे, अमोल अनक्कले, मोतीलाल डोईजोडे, रामचंद्र भोसले, सुनील गुडमेवार, सतीश धोंगडे, चेतन सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, केशव रंगवाळ, विजय मामुलवार, सुशील आपटे, साई आपटे, मारुती श्रीनिवास,सायकलिंग क्लबचे सदस्य आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऍड. दत्ताजी पाटील यांनी केले.
