राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्र निर्मितीचे विचारपीठ – डॉ. मल्लिकार्जुन करजगी

0
राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्र निर्मितीचे विचारपीठ - डॉ. मल्लिकार्जुन करजगी

राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्र निर्मितीचे विचारपीठ - डॉ. मल्लिकार्जुन करजगी

उदगीर (एल.पी.उगीले) : महाविद्यालयीन तरुणांच्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे समाजसेवेची कार्यशाळा आहेः व्यक्तिमत्व घडविणारे वैचारिक माध्यम आहे. या माध्यमातून तरुणांमध्ये स्वालंबन, ग्राम स्वच्छता, देशसेवा, पर्यावरण रक्षण याचे मूल्य रुजविण्यात येते. देशाला बलशाली करण्यासाठी जबाबदार नागरिक निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अतिशय महत्त्वाचे संस्कार केंद्र आहे. त्यामुळेच राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्र निर्मितीचे विचारपीठ आहे. त्यातूनच देश महासत्ता होऊ शकतो. असे स्पष्ट प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी केले.

कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर व संत सावतामाळी उच्च माध्यमिक विद्यालय मौजे दावणगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष वार्षिक युवक शिबिरात डॉ. मल्लिकार्जुन करजगी (संचालक राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर होते. तर मंचावर उद्घघाटक संत सावता माळी विद्यालयाचे संस्था सचिव तानाजीराव फुले, महाविद्यालय संस्था सचिव डॉ.विजयकुमार पाटील,प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. केशव अलगुले, प्राचार्य डॉ. शिवहार रोडगे, संस्था कोषअध्यक्ष मृदुला पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी डॉ. गणेश बेळंबे, डॉ.बाबुराव जाधव आदींची उपस्थिती होती. उद्घघाटकीय भाषणात तानाजीराव फुले म्हणाले की, संत तुकाराम महाराज, संत सावता माळी, संत गाडगे महाराज यांचा आदर्श तरुणांनी जोपासून आपले जीवन घडविले पाहिजे. त्याशिवाय निकोप समाजाची निर्मिती होणार नाही, असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर यांनी युवकांना सकारात्मक ऊर्जाशक्ती देणारे केंद्र म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या विभागाचा गौरव पूर्ण उल्लेख केला, आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विविध कार्याचा अहवाल सादर केला. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. केशव अलगुले व प्राचार्य शिवहार रोडगे यांचे यथोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी डॉ. गणेश बेळंबे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र कांबळे यांनी केले. आभार डॉ. बाबुराव जाधव यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण, संत गाडगे महाराज प्रतिमा पूजन, व दीपप्रज्वलन करून झाली. याप्रसंगी विद्यार्थी ज्ञानेश्वर कॅशे, संजीवनी कांबळे ,वैष्णवी गायकवाड, यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने गर्दी होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!