ज्ञानेश्वर बडगे यांचा उत्कृष्ट बीएलओ म्हणून सुशांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार
ज्ञानेश्वर बडगे यांचा उत्कृष्ट बीएलओ म्हणून सुशांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील एक कार्यक्षम मुख्याध्यापकांनी आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर बडगे यांनी बीएलओ म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली, त्याची दखल ही महसूल प्रशासनाने घेतली आहे.लोकसभा 2024 व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या दोन्ही वेळेला भाग क्रमांक 322 तिवटग्याळ मतदान केंद्रावर उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात मतदान झाले. उदगीर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मध्ये लोकसभेत 84 % पहिला क्रमांक व विधानसभा निवडणुकीत 84 %दुसरा क्रमांक मतदान टक्केवारी पटकावली.या बद्दल उपजिल्हाधिकारी डॉ सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम पंधरासे रुपये देऊन गौरविण्यात आले.
या निमित्ताने तिवटग्याळ नगरीतील सरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष कैलास तवर, तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, पुजा बिरादार, श्रीदेवी कोरे, छगनसिंग बिरादार,अक्षय पाटील, शैलेश पाटील, लखन पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी ज्ञानेश्वर बडगे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
