कै.भामाबाई शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण प्रसारक मंडळ गुरधाळ यांना जिल्हा युवा पुरस्कार
कै.भामाबाई शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण प्रसारक मंडळ गुरधाळ यांना जिल्हा युवा पुरस्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : कै. भामाबाई शिक्षण प्रसारक मंडळ गुरधाळ या संस्थेने जिल्ह्याच्या युवा विकास कार्यामध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले , जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर , जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सगर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते, महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा समजला जाणारा”आदर्श युवा पुरस्कार” संस्थेचे सचिव बापूराव पटणे यांना देऊन गौरविण्यात आले.
संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गोरगरीब लोकांना अन्नधान्याचे किट वाटप ,गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ,वृक्षारोपण कार्यक्रम , गोरगरिबांच्या मुलीच्या लग्नासाठी संसार उपयोगी साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते , आरोग्य शिबिरे ,इत्यादी कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. या सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेला पुरस्कार दिल्याबद्दल परिसरातील सुजाण नागरिकांकडून संस्थेचे कौतुक केले जात आहे.
