सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी पृथ्वीराज पाटील एकंबेकर तर स्वागताध्यक्ष पदी आ.संजय बनसोडे
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी पृथ्वीराज पाटील एकंबेकर तर स्वागताध्यक्ष पदी आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यासाठी 2025 च्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, संचालक आणि विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या सर्वांच्या उपस्थितीत सर्वानुमते पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांची सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली तर स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली.
पृथ्वीराज पाटील एकंबेकर हे एक युवा नेतृत्व असून सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून त्यांनी गेली अनेक वर्षांपासून आपली कामगिरी बजावली आहे 2024 सार्वजनिक शिवजयंती महत्त्वा समितीचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळला होता.अशा या युवा नेतृत्वाची पुन्हा एकदा सार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्ष पदी पृथ्वीराज पाटील यांची निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक विजयकुमार नुटूरे यांच्या हस्ते यांचा शाल, बुके देऊन सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरागीर सिद्धगिर गिरी सहसचिव किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रामकिशन मांजरे प्राचार्य शिवाजी महाविद्यालय उदगीर, पृथ्वीराज अशोकराव पाटील , विजयकुमार राजेश्वर नीटुरे माजी नगरसेवक, दिलीप हनुमंते मुख्याध्यापक विद्यावर्धिनी प्राथमिक शाळा उदगीर, सावन पस्तापुरे माजी नगरसेवक ,राम ढगे मुख्याध्यापक विद्यावर्धनि हायस्कूल ,बिपिन पाटील ,प्रशांत जगताप,मदन पाटील ,बाबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचलन.शिंदे यांनी केले तर आभार राम ढगे यांनी मानले.
