हावगीस्वामीतील कु.शुभांगी बिरादार यांचा राज्यस्तरीय युवामंच कविसंमेलनात सहभाग

0
हावगीस्वामीतील कु.शुभांगी बिरादार यांचा राज्यस्तरीय युवामंच कविसंमेलनात सहभाग

हावगीस्वामीतील कु.शुभांगी बिरादार यांचा राज्यस्तरीय युवामंच कविसंमेलनात सहभाग

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात राज्यस्तरीय आद्यकवी मुकुंदराज मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते.
सदरील संमेलनातील युवामंच कविसंमेलनात श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथील बी.ए. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु.शुभांगी विजयकुमार बिरादार यांना निमंत्रित करण्यात आले होते. या विद्यार्थिनींने हृदयाकडे वळत नाही.. ही कविता सादर करून सभागृहातील रसिकांना अंतर्मुख केले.
सदरील संमेलनात विक्रमकुमार कराड एम,ए.मराठी प्रथम वर्ष, कु.संध्या शिंदे बी.ए. द्वितीय वर्ष, कु.कल्याणी मुळे बी.ए. द्वितीय वर्ष, अक्षय दुवे बी.ए.प्रथम वर्ष या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदविला होता. राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात कवितेचे सादरीकरण केल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य,प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर , उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे, डॉ.म.ई.तंगावार, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!