अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा उप रुग्णालयामध्ये फळांचे वाटप
अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा उप रुग्णालयामध्ये फळांचे वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालय उदगीर तर्फे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. अशोकराव बापूसाहेब पाटील एकंबेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागाच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या समोरच असलेल्या जिल्हा उप रुग्णालयाच्या रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, एन.सी.सी. लातूर बटालियनचे सुभेदार हरिंदर सिंग, नायब सुभेदार देवेंदर कुमार महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. व्ही. एम. पवार इत्यादी उपस्थित होते.
स्व. अशोकराव पाटील एकंबेकर यांनी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे नेतृत्व करत असताना विद्यार्थ्यांचे हित व शैक्षणिक गुणवत्तेकडे अत्यंत तळमळीने लक्ष दिले होते. सार्वजनिक शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भव्य दिव्य शिवजयंतीचा पायंडा उदगीर व परिसरामध्ये घालून दिला. अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या विचारावर चालण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मत प्राचार्य डॉ. मांजरे यांनी व्यक्त केले. एन.सी.सी. विभागाचे सीटीओ प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी कॅडेट्सच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी डॉ. व्ही. डी . गायकवाड, डॉ .एस. डी. सावंत, क्रीडा संचालक एन.ए. खान, डॉ. डी. बी. कोनाळे, डॉ. ए.एस. टेकाळे, श्री गुंगेवाड तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
