नेटीझन्स येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चे शिबीर संपन्न
नेटीझन्स येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चे शिबीर संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : आर्ट ऑफ लिव्हिंग लातूर शाखा आणि नेटीझन्स फाउंडेशन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांना मेधा योगा चे पाच दिवसीय शिबीर नुकतेच नेटीझन्समध्ये संपन्न झाले. जिल्हा समन्वयक कैलास पाटील यांनी या प्रसंगी मेधा योगाच्या आणि सुदर्शन क्रियेच्या दैनंदिन सरावातून विद्यार्थी जीवनात दैनंदिन शिक्षणातील आनंद, स्थैर्य आणि समाधान शोधून तणावमुक्त शिक्षण घेता येणे शक्य आहे असा संदेश दिला. या शिबिराचे संचालन प्रशिक्षक अजय पाटील यांनी केले. तसेच गोविंद कापरे, संतोष मुतंगे आणि सीए संदीप नवटक्के यांनी स्वयंसेवक म्हणून उत्स्फुर्तपणे काम पाहिले. समारोप प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर तोडकर, बालाजी मुंढे, सुरज मस्के पाटील, राहुल खुदासे आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
