डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

0
डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी प्राथमिक विद्यालय, निडेबन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षा मानसी ताई चन्नावार, इनरव्हल क्लबच्या संस्थापक अध्यक्षा मीराताई चंबुले, निडेबनचे माजी सरपंच सुनीलजी सोमवंशी, आदर्श शिक्षक दशरथराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई शिंदे, महिला कार्यकर्त्या रंजनाताई नादरगे, आदर्श शिक्षक सूर्यकांतराव पांचाळ, पांडुरंगराव बोडके गुरुजी, संस्था सचिव देविदासराव नादरगे, युवा कार्यकर्ते गौतमजी सोमवंशी, मुख्याध्यापक ज्ञानोबा कुंडगिरे यांची उपस्थिती होती.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सादर केलेल्या आपल्या कलाविष्कारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. देशभक्तीपर गीत, लोकगीत, भक्तीगीत, नाटिका अशा विविध प्रकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नाटिकेच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला.
सूत्रसंचालन प्रफुलता बोडके व रोहित बिराजदार यांनी केले, तर आभार गोविंद रावळे यांनी मानले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी उमेश नादरगे, शरेश्चंद्र पांचाळ, विजयकुमार पवार, लक्ष्मण गायकवाड, अमोल कांबळे, वर्षाताई पाटील, मनोरमा तेलंगे, सुनिता शिंदे, आम्रपाली सोमवंशी, प्रशांत पांचाळ, विठ्ठल नादरगे,शशिकुमार पाटील आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!