ॲड.दीपाली औटे व ज्योती बानापुरे यांचा सत्कार
ॲड.दीपाली औटे व ज्योती बानापुरे यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्याच्या धडाडी च्या युवा नेत्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या ॲड. दीपाली औटे व शंभूउमरगा येथील ज्योती बानापुरे यांचा हत्तीबेट श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ॲड. दीपाली औटे यांनी केलेल्या सामाजिक आणि संघटनात्मक कामाची दखल घेऊन त्यांना जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार असून हा पुरस्कार त्यांना मिळाल्या बद्दल तसेच ज्योती बानापुरे यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी झाल्याबद्दल दिपाली औटे व ज्योती बानापुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हत्तीबेट श्री स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष व्ही. एस.कुलकर्णी, अनिता संकाये,सुनंदा सरदार, गोकर्णा सूर्यवंशी इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ॲड. दिपाली औटे म्हणाल्या की, समाजसेवा आणि अध्यात्मक क्षेत्रातील मान्यवरांच्या हातून सत्कार होणे हे भाग्याचे असते. त्यांचा आशीर्वाद हा आम्हाला लाभल्यामुळे आम्ही भविष्यकाळात यापेक्षाही दुप्पट जोमाने समाजसेवा करण्यासाठी प्रयत्न करू. आपल्या लोकांनी केलेल्या सत्काराचे मोल फार मोठे असते. सत्कार म्हणजे आणखी जास्त काम करण्याचे प्रेरणा आणि ऊर्जा देणारे कार्यक्रम असतात. याची जाण आणि भान ठेवून भविष्यात काम करू अशी आश्वासन दिले. या सत्कार सोहळ्यासाठी श्री स्वामी समर्थ ग्रुप हत्तीबेट येथील सर्व सदस्य व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
