महात्मा फुले विद्यालयात उत्साहात स्वयंशासन दिन साजरा

0
महात्मा फुले विद्यालयात उत्साहात स्वयंशासन दिन साजरा

महात्मा फुले विद्यालयात उत्साहात स्वयंशासन दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात उत्साहात स्वयंशासन दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले विद्यालयात स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारत शिक्षक, कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या भूमिका पार पाडल्या.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रार्थनेनंतर झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर. जाधव आणि उपमुख्याध्यापक बी.व्ही. बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंशासन दिनाचे नियोजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थी ओंकार मुंढे याने मुख्याध्यापकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली, तर कृतिका चिलगर हिने उपमुख्याध्यापिकेची जबाबदारी सांभाळली. पर्यवेक्षक म्हणून प्रतीक तांदळे व आदित्य वळसंगे, कारकून म्हणून संध्या लोंढे व वेदांत भंडे, क्रीडा शिक्षक म्हणून माधव नावंदे, तर सेवक म्हणून शिवम वाघमारे व योगेश सोमटकर यांनी आपापल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन विविध विषयांचे अध्यापन केले. शालेय प्रशासनाची जबाबदारी स्वीकारताना त्यांना शिस्त, नियोजन आणि जबाबदारीचे महत्त्व जाणवले. स्वयंशासन दिनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.

कार्यक्रमाला विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बालाप्रसाद काबरा यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वयंशासनाचा प्रत्यक्ष अनुभव कसा महत्त्वाचा आहे, यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.पु. डांगे, नागेश मुसळे आणि पुरुषोत्तम माने यांनी या उपक्रमाचे विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वयंशासनाचे महत्त्व समजावून सांगितले व त्यांना विविध कार्यपद्धतींचे प्रशिक्षण दिले.

या विशेष उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने शाळेत आगळावेगळा आदर्श निर्माण झाला असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!