अखेर नॅशनल हायवे अहमदपूर-शिरूर ताजबंद आणि चाकूर येथे अपघात विरोधी यंत्रणा कार्यान्वित
अखेर नॅशनल हायवे अहमदपूर-शिरूर ताजबंद आणि चाकूर येथे अपघात विरोधी यंत्रणा कार्यान्वित
सम्राट मित्र मंडळाच्या पाठपूराव्यास यश..
अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या अनेक महिन्यांपासून या ना त्या कारणाने नॅशनल हायवेच्या अहमदपूर शहर, शिरूरताजबंद शहर आणि चाकूर शहराला जोडणाऱ्या बायपासच्या सुरूवातीच्या आणि शेवटच्या ठिकाणी स्पीडब्रेकर,फलक,लाईट आदी प्रलंबित असलेली अपघात विरोधी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावे यासाठी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी अहमदपूर-शिरूर ताजबंद आणि चाकूर शहर बंदचा ईशारा देताच खडबडून जागे झालेल्या नॅशनल हायवेच्या प्रशासनाकडून दोन दिवसात यंत्रणा कार्यान्वित करण्याचे लेखी पत्र काल दिनांक 5 फेब्रुवारी रोजी देवून आज लगेचच या कामाला सूरूवात करण्यात आली.
नॅशनल हायवे 361वर वहातूक सूरूवात झाली मात्र या तिन्ही शहराच्या ठिकाणी अपघात विरोधी यंत्रणा नसल्या कारणाने सतत छोटे मोठे अपघात होत होते.या मध्ये अनेकांचे जीव गेले.अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.मात्र वारंवार विनंती करून निवेदन देवून सूध्दा कूठलीच कार्यवाही केलेली नाही.
या बाबत माजी आमदार लोकनेते बब्रुवान जी खंदाडे साहेब यांनी सूध्दा प्रकल्प संचालकाकडे फोन वरून सूचना देवून लेखी पत्र सूध्दा पाठविले होते.
या बाबत सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर वतीने नॅशनल हायवे अथोरेटी ऑफ इंडीया यांच्या नांदेड येथील प्रकल्प संचालकाकडे निवेदन दिले होते मात्र तरीही कूठलीच कार्यवाही झाली नाही.मात्र या तिन्ही ठिकाणी अपघाताची मालिका चालूच होती.
शेवटी नाविलाजाने सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर च्या वतीने युवा नेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी पूढाकार घेवून या तिन्ही ठिकाणी तातडीने अपघात विरोधी यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा अहमदपूर शहर-शिरूर ताजबंद शहर आणि चाकूर शहर पूर्णपणे बंद करण्याचा ईशारा प्रशासनास दिला होता.
या नंतर प्रशासन अलर्टमोड वर येत उपविभागीय अधिकारी अहमदपूर व तहसीलदार अहमदपूर यांनी या बाबत नॅशनल हायवेच्या प्रकल्प संचालकांना ही गंभीर बाब कळवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जवाबदार रहाल अशा प्रकारचे लेखी पत्र काढून त्यांना अहमदपूर येथे बैठकीस पाचारण करण्यात आले.तहसील कार्यालय अहमदपूर येथे नॅशनल हायवे चे संबंधीत अधिकारी व सम्राट मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यां सोबत बैठक घेण्यात येवून या विषयी चर्चा करण्यात आली.शेवटी पूढील दोन दिवसात अहमदपूर शिरूरताजबंद आणि चाकूर या तिन्ही ठिकाणी स्पीडब्रेकर,फलक,लाईट अशा अपघात विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे लेखी पत्र दिले होते.त्या नंतर बंद अंदोलन मागे घेण्यात आले होते.
लेखी पत्र दिल्या नूसार आज लगेचच या कामाला मरशिवणी(अहमदपूर) येथे सूरूवात करण्यात आली.उद्या पर्यंत शिरूरताजबंद आणि चाकूर येथे हे काम पूर्ण होणार आहे.
अपघात विरोधी यंत्रणा कार्यान्वित केल्याने अपघाताचे प्रमाण कमी होऊन लोकांचे जीव वाचवणार असून जनतेचा सुरक्षित प्रवास होण्यास मदत झाली आहे.
जिल्हा व तालूका प्रशासनाने अतिशय चांगल्या पध्दतीने हा विषय हाताळल्या बद्दल जिल्हाधिकारी सौ.वर्षांताई ठाकूर घुगे,उपजिल्हाधिकारी मंजूषा लटपटे,तहसीलदार उज्वलाताई पांगरकर मॅडम, पोलिस उपाधिक्षक मनिष कल्याणकर साहेब,पोलिस निरीक्षक भूसनूर साहेब आणि पत्रकार बांधव आदींचे सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,अजय भालेराव,भिमराव कांबळे,सचिन बानाटे,आकाश पवार,गणेश मूंडे,दयानंद वाघमारे आदींनी आभार व्यक्त केले आहे.
