सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे दि. 07 फेब्रुवारी रोजी रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संचालक कुलदीप हाके पाटील प्रमुख उपस्थिती संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होत्या. सुरवातीला माता रमाई याच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना संचालिका शिवलिका हाके म्हणाल्या माता रमाई या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती.परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत तिथे लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली घरातील सोन्याच्या बांगड्या विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन यायला सांगतात म्हणून तर म्हणतात “भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या… सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई | धन्य रमाई |” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक हरिदास सर यांनी केले व सूत्रसंचालन कोईलवाड सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या विषयी भाषणे सादर केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!