इनरव्हील क्लब व लिनेस क्लबच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालयात सायकलीचे वाटप
इनरव्हील क्लब व लिनेस क्लबच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालयात सायकलीचे वाटप
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील इनरव्हील क्लब व लीनेस क्लब च्या वतीने गरजू आणि होतकरू मुलींना संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिनेश क्लबच्या अध्यक्षा रेखाताई हाके पाटील प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजयाताई भुसारे, यावेळी व्यासपीठावर सचिव एड. राणी महाजन, रेखा बाळूरे, शैलजा सांगवीकर, आशा रोडगे, मीना तोवर, कलावती भातांब्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती .
याप्रसंगी विद्यार्थ्यांना आहार, व्यायाम,सूर्य नमस्कार, सूर्य तपस्या यावर शैलजा सांगवीकर व कलावती भातंब्रे यांनी मार्गदर्शन करून मानवी जीवनात सायकलीचे महत्त्व पटवून सांगितले.
अध्यक्षीय समारोप रेखाताई हाके पाटील यांनी केला.
शाळेतील होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थिनी सोनाक्षी अंगद कांबळे, भक्ती देविदास कुमदळे, दिव्या मारुती वानखेडे यांना मान्यवरांच्या हस्ते सायकल देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला लीला डबीर, शीला घाटोळ, शुभांगी पाटील, शितल महाजन, सविता पाटील, संगीता आबंदे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीनाक्षी तोवर यांनी केले सूत्रसंचालन संगीता आबंदे यांनी तर आभार आशाताई रोडगे-तत्तापुरे यांनी मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
