संत ज्ञानेश्वर विद्यालयात बाल संस्कार वाचनालयाचा शुभारंभ
संत ज्ञानेश्वर विद्यालयात बाल संस्कार वाचनालयाचा शुभारंभ
अहमदपूर (गोविंद काळे) : चिमुकल्या बालकांना बाल वयात वाचना चे संस्कार व्हावेत या उदात्त हेतूने संत ज्ञानेश्वर विद्यालयात आज बाल संस्कार वाचनालयाच्या उपक्रमाचा शुभारंभ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते देवेंद्र देवणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सदरचा उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समिती लातूर द्वारा संचालित श्रीराम साप्ताहिक शाखेच्या वतीने चालू करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते जुगलकिशोर शर्मा, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विश्वनाथ विळेगावे, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मीना तोवर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती .
या समयी भारती प्रकाशनाच्या बाल पुस्तक माला चे 135 पुस्तकांचे दोन संच विद्यालयास देण्यात आले.
यावेळी देवेंद्र देवणीकर आणि जुगल किशोर शर्मा, विश्वनाथ विळेगावे यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली.
प्रास्ताविक आशा रोडगे यांनी सूत्रसंचालन शारदा तिरूके यांनी तर आभार मीना तोवर यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
