घनू वाजे घून घुना वारा वाहे ऋण झुना,भावतारकू हा कान्हा वेगी भेटवा का!..प्रवचनकार डॉ भिकाने
घनू वाजे घून घुना वारा वाहे ऋण झुना,भावतारकू हा कान्हा वेगी भेटवा का!..प्रवचनकार डॉ भिकाने
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मानखेड येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचनकार डॉ नरसिंह भिकाने यांनी उपस्थित भक्तांना ज्ञानयोग,कर्मयोग व भक्तियोग यातील समनवयता व समुच्चयता समजावून सांगत असताना संत ज्ञानेश्वरांना घनू वाजे घून घुना वारा वाहे रुणझुना,पैल तो गे काऊ कोकत आहे,अवचिता परीमळू झुळकला अळुमाळू,इवलेसे रोप लावीयले द्वारी त्याचा वेलू गेला गगणावरी,रून झुण रुन झुण रे भ्रमर सांडी तू अवगुनू रे भ्रमरा या संत ज्ञानेश्वरांच्या वैरागिनींमधून निसर्ग व पक्षी यामध्ये विठ्ठलाचे अधिष्ठान कसे दिसायचे हे समजावून सांगितले.संत ज्ञानेश्वर हे अलौकिक होते कारण ज्ञानियांचा राजा गुरू महाराव!म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें असे स्वतः विश्वगुरु संत तुकाराम महाराज त्याच्याविषयी म्हणता
,ते अद्वितीय होते कारण त्यांनी जड,निर्जीव भिंतीसारखे व अज्ञानी रेड्यासारखे लोक ज्ञानरुपी गंगेत पवित्र केली,ते अपूर्व होते कारण आजपर्यंत श्रीमद भगवतगीतेवेर सर्व भाषेत 108 टीका पर विश्लेषण झाले आहेत परंतु ज्ञानेश्वरी ही देशातील सर्वात अपूर्व असा ग्रंथ आहे.आपल्या दोन तास केलेल्या प्रवचनात त्यांनी भगवतगीतेतील ज्ञानयोग हा संत तुकारामांच्या अनेक अभंगातून वर्णन करत असताना तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी,भगवे तरी श्वान तेथे अनुभवाचा काय पंथ,मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसें,बोलचीच कढी बोलचीच भात, शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी,अंगी भरला ताठा नये वळणी जैसा खुंटा,अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड,एक बिजा केला नास मग भोगले कणीस यासारखी प्रत्येक शब्दात अंधश्रद्धा व अज्ञान यावर करडा प्रहार करणारी अभंग विश्लेषित करत भक्तांना समजवली. कर्मयोग हा संस्कृतमधून गीतेत असणाऱ्या हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।
या सारख्या अनेक मुखदगत श्लोकांचे मराठीत विवेचन करत समजावला.भक्तियोग हा ज्ञानेश्वरीतील सांग पा महाफनी दर्दूरे गिळीजे कोई का पवणू मेघाशी भिये का अमृतासी मरण आहे यासारख्या अनेक ओव्यानमधून प्रकट केला.यासाठी डॉ भिकाने यांनी अनेक दृष्टांत दिले व शेवटी श्रीराम यांच्या भारत ते लंका प्रवासाचे वर्णन करत राजा राम हे त्यांच्या या अलौकिक प्रवासाने श्रीराम बनले हे सांगत आज संपूर्ण आग्नेय आशियातील देश जसे म्यानमार,थायलंड, लाओस,फिलिपाइन्स,मलेशिया,इंडोनेशिया या देशांमध्ये भलेही त्या लोकांनी धर्म बदलला परंतु श्रीराम व रामायण यांना आपली धरोहर मानतात व आजही या देशांमध्ये श्रीराम,विष्णू,गणेश यांची मंदिरे आहेत.त्यामुळे आपण जीवनात जर ज्ञान,कर्म व भक्ती याची योग्य व योग अशी सांगड घातली तर श्रीराम,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासारखे अद्वितीय कामे करू शकतो असे मार्गदर्शन केले.यावेळी भक्त व महिला यांची मोठी उपस्थिती होती.
