लातूर जिल्हा सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजन

0

उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक 08:00 वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 8, 10 12, 14 वर्षाखालील मुले – मुली या वयोगटाप्रमाणे घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंना मेडल्स व विशेष प्राविण्य प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तसेच या स्पर्धेतून लातूर जिल्हा संघाची निवड केली जाईल. निवड झालेल्या खेळाडूंना पंढरपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सहभाग घेता येणार आहे. खेळाडूंनी स्पर्धेस येताना क्रीडा प्रकार शुल्क, जन्म तारखेचा दाखला घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे सचिव ॲड. विक्रम संकाये, सहसचिव निजाम शेख, कार्याध्यक्ष प्रा.व्ही.आर.हुडगे, प्रा. सतिश मुंढे, प्रा. सचिन चामले यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!