“मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान ” या विषयावर 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
"मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान " या विषयावर 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे दि. 4 ते 6 फेब्रुवारी 2025 दरम्यान “मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मिती” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले १९ दुग्धव्यवसायिक व नवउद्योजकांनी सहभाग नोंदवून पनीर व्हे आधारित पेय, गूळपेढा, केसर बासुंदी, रोझ लस्सी, मँगो लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, कलाकंद व सुगंदी दूध निर्मिती तंत्रज्ञान समजून घेतले.या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून डॉ. नितीन शिंदे आणि डॉ. हेमंत गावंडे यांनी जवाबदारी पार पाडली, तर डॉ. श्रीकांत कल्याणकर, डॉ. वैभव लुले आणि डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी सह-समन्वयक म्हणून कार्य केले. हे संपूर्ण प्रशिक्षण डॉ. माधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभाला डॉ. खरटमल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर समारोप समारंभासाठी डॉ. गायकवाड यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली
प्रशिक्षणादरम्यान डॉ. प्रवीण सावळे, प्रा. महेश देशमुख आणि इं. खोडवे यांनी संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले.प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण स्मरणीकां भेट देण्यात आली.सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींनी महाविद्यालयाच्या अध्यापक व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी केली.
