ब्रह्मोत्सव पालखी सोहळ्यात लोटला जनसागर
ब्रह्मोत्सव पालखी सोहळ्यात लोटला जनसागर
उदगीर (प्रतिनिधी) : श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या 62 व्या ब्रह्मोत्सव निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात दर्शन घेण्यासाठी भक्ताचा जनसागर उसळला होता. येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण मंदिर च्या 62 व्या ब्रमित्सवा निमित्त पाचव्या दिवशी श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथून भव्य पालखी निघाली,सदरील पालखी मंदिर,हनुमान कट्टा, आर्य समाज, चोबारा,कॉर्नर ते मुख्य बाजारपेठेतून परत लक्ष्मीनारायण मंदिर येथे पोहचली,पालखी चे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगणांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गर्दी केली होती,भक्त फुलाची उधळण करत जागो जागी आरती पुष्प माला अर्पण करत होते,पालखी मंदिरात पोहोचताच फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली. तदनंतर आरती होऊन श्रीरंग कृष्ण कुमार मालू परिवारातर्फे महप्रसाद देण्यात आला, मागील 5 दिवसा पासून सुरू असलेल्या ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
