मरावे परी कीर्तिरूपे उरावे – प्रा. पवन सूर्यवंशी

0
मरावे परी कीर्तिरूपे उरावे - प्रा. पवन सूर्यवंशी

मरावे परी कीर्तिरूपे उरावे - प्रा. पवन सूर्यवंशी

उदगीर (प्रतिनिधी) : जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी संपतोच, परंतु त्याच व्यक्तीची नोंद समाज घेत असतो जे लोक इतरांसाठी काहीतरी करतात. याची जाण आणि भान ठेवून स्व. रोहित लाल त्यांच्या नातेवाईकांनी फुल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून रोहित लाल यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. ही कौतुकाची बाब असल्याचे प्रा. पवन सूर्यवंशी यांनी सांगितले.

ते जीवन प्रयाग फाऊंडेशन उदगीरच्या वतीने सक्सेस कोचिंग क्लासेस येथे स्व. रोहित लाल यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त व्याख्यान व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे , आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या व्याख्यान व साहित्य वाटप कार्यक्रमात मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महालिंग मठपती,प्रमुख पाहुणे अभाविप शहर सहमंत्री नितीश शिरशे , प्रमुख वक्ते प्रा. पवन सुर्यवंशी, कार्यक्रम प्रमुख रुद्राक्ष लाल ई. उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.पवन सुर्यवंशी म्हणाले आपले आई-वडील जिवंत असे पर्यंत त्यांची सेवा करा. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये स्वतः यशस्वी फुल त्यांचे स्वप्न साकार करा. हे जीवनाचे सार्थक आहे. आपण सर्व मध्यमवर्गीय परिवारातील आहोत, आपल्या किमान गरजा पूर्ण होत आहेत. शिक्षणासोबतच आज आपल्याला शिकवणी वर्ग येथे येण्याचे भाग्य लाभले आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पालक नाहीत, काहींना पालक आहेत तर काहींना शिक्षणाची सोय नाही. आपल्याला किमान शिकवणी लावण्यासाठी तरी आपले पालक आपल्याला मदत करत आहेत. असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभात सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन आणि परिचय अमेय गवारे यांनी करून दिले. आभार रुद्राक्ष लाल यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!