दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय : उदगीरात जल्लोष
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय : उदगीरात जल्लोष
उदगीर (एल.पी.उगीले) : दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली मध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल उदगीर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उत्तरा कलबुर्गे, शिवशंकर धूपे, उदय ठाकूर, गणेश गायकवाड, अमोल अंकुले, आनंद बुंदे, रामेश्वर पवार, लखन कांबळे, मोतीलाल डोईजोडे, बापूराव येलमटे , दत्ता पाटील, दिलीप मजगे, संजय पाटील, आनंद साबणे, शिवकर्णा अंधारे, मारुती कोटलवार, चेतन सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, व्यंकट काकरे, रवी कासले, सुजित जीवने, धनराज जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
