श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेकडून श्याम परिवारातील कुंभमेळ्यासाठी गेलेल्या यात्रेकरूंचे स्वागत
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेकडून श्याम परिवारातील कुंभमेळ्यासाठी गेलेल्या यात्रेकरूंचे स्वागत
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामला स्मारक शिक्षण संस्थे तर्फे श्याम परिवारातील सदस्यांसाठी प्रयागराज कुंभमेळा, आयोध्या व काशी या ठिकाणी सांस्कृतिक व ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये 41 सभासदाने सहभाग नोंदवलेला होता. ही यात्रा सफलतापूर्वक पूर्ण करण्यात आली.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य, सहसचिव अंजुमनी आर्य, द्यूमनवंशी आर्य, पाविरावी आर्य, श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर ,भाग्यश्री मुंडकर, विमल मुंडकर ,ईश्वरी मुंडकर,दक्ष मुंडकर,वेदावती मुंडकर नरेश मुंडकर,मंजुषा पाटील,जयश्री मुंडकर,शामलाल कला क्रीडा व विज्ञान अकॅडमीचे संयोजक बालाजी चव्हाण, वंदना चव्हाण, काशीबाई चव्हाण ,शामल अंजुष डोंगे,वनिता जाधव,शिवाजी देवने, अनुराधा देवणे ,अरुणा देवणे, कमलाबाई पाटील ,भानुदास लंगोटे ,सुनंदा लंगोटे ,सोनाली कस्तुरे,प्रमोद कावरे ,अर्चना कावरे ,गोपाळ पुलागोर, नीला पुलागोर,विक्रम मलकापूरे,तुकाराम मलकापूरे, शोभा मलकापूरे,शांता घेरे ,राहुल गुरमे, श्रीहरी निडवंचे ,संदीप लंगोटे ,ज्योती गीत्ते ,योगिता सोळुंके ,संतोष कोयले, अंजली चंदे,चेतन राठोड या सर्व तीर्थ यात्रेकरूंचे श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सर्व आस्थापना कडून भव्य दिव्य स्वागत सत्कार करण्यात आले.
संस्था अध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांच्या संकल्पनेतून सर्व यात्रेकरूंना अविस्मरणीय फोटो फ्रेम देण्यात आली. या कार्यक्रमासाठी ॲड. रमाकांत चटनाळे, राम मोतीपवळे, पी जी पाटील ,मोहनराव निडवंचे, अभंगराव कोयले, भारत खंदारे प्रवीण भोळे, विवेक उगिले, विजय बैले, राहुल लिमये, अवंतिका मोरतळे, रेखा लाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
