वैचारिक अधिष्ठान असलेली भाजपा एकमेव पार्टी – राहुल केंद्रे

0
वैचारिक अधिष्ठान असलेली भाजपा एकमेव पार्टी - राहुल केंद्रे

वैचारिक अधिष्ठान असलेली भाजपा एकमेव पार्टी - राहुल केंद्रे

उदगीर (एल.पी.उगीले) : वैचारिक अधिष्ठान असलेली पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी होय, या वैचारिक पर्वात सर्वांनी सामील व्हावे. असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व उदगीर विधानसभा मतदार संघ प्रमुख राहुल केंद्रे यांनी केले.
रावणकोळा येथे आयोजित संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानात राहुल केंद्रे बोलत होते.
राष्ट्र प्रथम नंतर पक्ष, शेवटी स्वतः असे वैचारिक अधिष्ठान असणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे , या वैचारिक भूमीकेमुळेआज देशात भारतीय जनता पार्टीला मोठा जनाधार मिळाला आहे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी विकासाची दूरदृष्टी कुठल्याच दुसऱ्या पक्षात नाही, देश विकसित होत आहे. या सर्व बाबी पाहता आज भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व आपण स्वीकारलं पाहिजे. असे आवाहनही विधानसभा प्रमुख राहुल केंद्रे यांनी केले.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली होणारी प्रगती जनसामान्यांच्या हिताचा विचार करणारी आहे, त्यामुळे या विकास पर्वात आपण सर्वांनी सहभागी होवे, असे आवाहन केंद्रे यांनी केले.
या वेळी तालुकाअध्यक्ष सत्यवान पांडे,बालाजीराव गवारे ,सोमेश्वर सोप्पा,बालाजी केंद्रे,बालाजी मालुसरे,मंगेश हुंडेकर, गौस पटेल, संतोष केसगिरे, आनंद साबणे, बाबूराव गुट्टे, रत्नाकर केंद्रे उपस्तिथ होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!