पंडित दीनदयालच्या रासेयो कार्यक्रमात व्याख्यानाचे आयोजन

0
पंडित दीनदयालच्या रासेयो कार्यक्रमात व्याख्यानाचे आयोजन

पंडित दीनदयालच्या रासेयो कार्यक्रमात व्याख्यानाचे आयोजन

देवणी (एल.पी.उगीले) : पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय, देवणीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर बोरोळ ता.देवणी येथे चालू आहे. यानिमित्ताने आयोजित व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी बोरोळ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरुण आलमले , प्रमुख पाहुणे डॉ.म.ई.तंगावार, डॉ.जोगन मोरे, डॉ.विलास गाजरे हे उपस्थित होते. तर मंचावर लोकनियुक्त सरपंच कृष्णा पाटील, सेवानिवृत्त संजय खुळे शालेय शिक्षण समितिचे अध्यक्ष सत्यदेव गरड, निवृत्ती सूर्यवंशी, व्यापारी दत्ता हुरुसनाळे, राहुल बालुरे यांची उपस्थिती होती.
बोरोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सुरुवातीला सुंदर असे स्वागतगीत नृत्याच्या माध्यमातून सादर केले. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमाचा जो आराखडा तयार करण्यात आला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा असून शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव मिळेल, असे डॉ.जोगन मोरे यांनी सांगितले. मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तो कायमच टिकून ठेवण्यासाठी आपल्या सगळ्याला प्रयत्न करावे लागतील. असे विचार डॉ. विलास गाजरे यांनी व्यक्त केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मध्ययुगीन उत्कृष्ट कलाकृती, शिलालेख व ताम्रपट यामुळे मिळालेला आहे. त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य असल्याचे डॉ.म.ई. तंगावार यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक अरुण आलमले म्हणाले, शालेय पातळीवर मराठी विषयाकडे दुर्लक्ष होता कामा नये, माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रत्येक शाळेत मराठीचा शिक्षक असणे काळाची गरज आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुद्धिराज डोंगरे,संजय शिंदे, सिध्दार्थ सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, गावातील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.कांत जाधव तर आभार डॉ.बी.एस.धोतरे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!