बालकलाकांराच्या कलाविष्काराने उदगीरवासीय झाले मंत्रमुग्ध

0
बालकलाकांराच्या कलाविष्काराने उदगीरवासीय झाले मंत्रमुग्ध

बालकलाकांराच्या कलाविष्काराने उदगीरवासीय झाले मंत्रमुग्ध

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान द्वारा संचलित येथील देगलूर रोडवरील नाईकनगर चौक स्थित महात्मा पब्लिक स्कूलचे रघुकुल मंगल कार्यालयात स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमांमध्ये महात्मा पब्लिक स्कूलच्या स्थापनेपासूनच्या परंपरेला व सांस्कृतिकतेला साजेसा असा उत्कृष्ट व विद्यार्थ्यांच्या अद्भुत कला गुणांना वाव देणारा असा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः स्वामी विवेकानंद व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व दीप प्रज्वलानी करण्यात आली. अध्यक्षस्थानी नवनिर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वास पडीले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल व औषधी असोसिएशनचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान बोरोळकर, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज दादा पुदाले, भाजपा महिला आघाडीच्या उत्तराताई कलबुर्गे, ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक नेत्रगावे पाटील, सचिव सौ.संगीताताई दिपकराव नेत्रगावे पाटील, राष्ट्रवादी कला व सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, मानकीचे माजी सरपंच सतीश पाटील मानकीकर, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब शिंदे अतनूरकर, सिद्धी करिअर ॲकाडमीच्या संचालिका सौ.नंदाताई स्वामी, शांतकुमार स्वामी, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.संध्या बालासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या चंचलाताई हुगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये लहान बालकांनी, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोककला लावणी, धनगर गीते, भक्ती गीते, लोकगीते, राष्ट्रगीते, रिमिक्स गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद्ध, कर्मचारी यांनी तसेच मुख्याध्यापक आनंद चिंचोले यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद चिंचोले यांनी केले. प्रास्ताविक भाषण दीपकराव नेत्रगावे पाटील यांनी केले. आभार प्राचार्या सौ.संगीताताई दिपकराव नेत्रगावे पाटील यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!