राज्यस्तरीय रंगभरण , चित्रकला, निबंध स्पर्धेतील श्री पांडूरंग विद्यालयाचे यश

0
राज्यस्तरीय रंगभरण , चित्रकला, निबंध स्पर्धेतील श्री पांडूरंग विद्यालयाचे यश

राज्यस्तरीय रंगभरण , चित्रकला, निबंध स्पर्धेतील श्री पांडूरंग विद्यालयाचे यश

उदगीर (एल पी उगिले) : तालुक्यातील श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय रंगभरण, चित्रकला, निबंध स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. या स्पर्धा रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा, प्रतिष्ठान (महाराष्ट्र) उदगीर आणि सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुक्रमाबाद ता. मुखेड आयोजित भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय भव्य रंगभरण, चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत इ.10 वी. वर्गातील कांबळे सुजित विजयकुमार हा विद्यार्थी रंगभरण स्पर्धेत प्रथम आला आहे. इ. 8 वी. वर्गातील श्रीमंगले योगेश मारोती हा विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत प्रथम आला आहे. तर निबंध स्पर्धेत इ.9 वी. वर्गातील कु. कांबळे प्रज्ञा अण्णाराव ही द्वितीय आली आहे. पुरस्कार स्वरूप – प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम 5001 प्रथम, 3001 द्वितीय,( विभागून ) देण्यात आले. या प्रसंगी मा. श्री रामचंद्रजी तिरुके साहेब, सचिन शिवशट्टे, ज्ञानेश्वर बडगे, हनुमंत केंद्रे, प्रा. बिभीषण मद्धेवाड (अध्यक्ष), महादेव खळुरे (स्पर्धा संयोजक), सिद्धार्थ सूर्यवंशी व मारुती भोसले (उपाध्यक्ष) व संस्थेचे सर्व पदाधिकारी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 रे लोकसंस्कृती साहित्य संमेलन,शिवाजी महाविद्यालय,उदगीर येथे संपन्न झाला.

           या विद्यार्थ्याला कला  शिक्षक- नादरगे चंद्रदीप यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. गोविंदरावजी केंद्रे, संस्थेचे सचिव  विनायकरावजी बेंबडे , संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही. व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!