विमलाबाई देशमुख कन्या प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
विमलाबाई देशमुख कन्या प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
अहमदपूर (एल.पी.उगीले) : येथील विमलाबाई शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लोकायत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सीमाताई देशमुख या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभाताई राजपंगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकायत चॅरिटेबल संस्थेच्या सदस्या अनिताताई देशमुख व रुपालीताई देशमुख, विमलाबाई देशमुख प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर व माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदाताई कुलकर्णी, योगशिक्षिका कालावती भातंबरे व विमलाबाई माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीताताई कोयले ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात माई सावित्री बाई फुले यांच्या व सावित्रीबाई फुले यांचा मुलींची शाळा काढण्याचा वारसा जपणारे लोकायत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कै. भाई किशनराव देशमुख व कै. विमलताई देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावरील उद्घाटक, अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तन्वी गोरटे या विद्यार्थिनीने स्वागत गीतावर सुंदर नृत्य सादर केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती राजपंगे यांनी केले. या वार्षिक स्नेहसंमेलनात लावणी, कोळीगीत देशभक्ती गीत, गोंधळ गीत, बालगीत, मंगळागौर, आदिवासी गीत, वासुदेव गीत अशा विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले, व प्रेक्षकांची मने जिंकली.
