विद्या वर्धिनी हायस्कूलमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा शांतते संपन्न
विद्या वर्धिनी हायस्कूलमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा शांतते संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा घेण्यात येणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्या वर्धिनी हायस्कूल या शाळेत शांततेत संपन्न झाली. या परीक्षा केंद्रावर मराठी, इंग्रजी माध्यमाच्या 217 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. 217 पैकी 211 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.केंद्र संचालक म्हणून डी.बी हिप्पळगे यांनी काम पाहिले तर पर्यवेक्षक म्हणून कलाशिक्षक एन.आर जवळे, व्ही.सी पाटील,एस.एम मंदाडे, एस.सी सय्यद,एस.बी घोगरे,एम. के गिरी,आर.व्ही बिरादार, सुनील पाटील,एस.एम खोंडे, जी.बी ढवळे,सी.टी जाधव यांनी काम पाहिले.या परीक्षे दरम्यान उदगीर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शफी शेख,साधन व्यक्ती श्रीमती एस. एन उगीले यांनी धावती भेट देऊन समाधान व्यक्त केले. काही अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
