वारली पेंटींगने जपली लोकसंस्कृती – आ. संजयजी बनसोडे
वारली पेंटींगने जपली लोकसंस्कृती - आ. संजयजी बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीर आयोजित 3 रे लोकसंस्कृती एकदिवसीय साहित्य संमेलनात सृजन रंगकर्मी कलादांनातील चित्राची पाहणी करताना आ. संजयजी बनसोडे यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. विविध कलादलनातील पेंटिंग पाहून ते म्हणाले, भारतीय लोककलेच्या संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या वारली चित्रांनी संपूर्ण चित्र प्रदर्शनाला एक वेगळाच साज दिला आहे. ही वारली चित्रे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या समृद्ध लोककलेचे प्रतीक आहेत. चित्र प्रदर्शनातील हे मुख्य आकर्षण आहे. वारली पेंटिंगने चित्र प्रदर्शनात लोकसंस्कृती जपली आहे असे ते म्हणाले. श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर येथील कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप यांनी बनवलेली वारली पेंटिंग्स मध्ये प्राकृतिक घटक, मानवी जीवन, सण – उत्सव, नृत्य, शेती आणि पशुपालन यासारख्या विषयाचे प्रभावी चित्रण मी केले आहे असे सांगून या आगळ्यावेगळ्या पेंटिंग्स मुळे पारंपारिक कला पुनरुज्जीवीत होत असून भविष्यात अशाच कलात्मक उपक्रमाच्या माध्यमातून वारली पेंटिंग ला नवसंजीवनी मिळेल. असा आशावाद याप्रसंगी व्यक्त केला.
सदरील सृजन रंगकर्मी कलादालनाचे शुभारंभ डॉ.मार्तंड कुलकर्णी सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, प्राध्यापक प्रकाश होळकर, प्रा.बिभिषण मद्देवाड यांच्या हस्ते करण्यात झाले.संमेलनाध्यक्ष प्रा.इंद्रजीत भालेराव सुप्रसिद्ध साहित्यिक परभणी, प्रसिद्ध सिने अभिनेत्री आदिती सारंगधर, उद्घाटक मा.आ.संजय बनसोडे माजी क्रीडामंत्री महाराष्ट्र राज्य, स्वागताध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, कार्यवाहक रामचंद्र तिरुके, डायटचे प्राचार्या डॉ. भगीरथी गिरी ,सिद्धार्थ सूर्यवंशी, मारोती भोसले, रामदास केदार, जहांगीर पाटेल, रसूल पठाण, लक्ष्मण बेंबडे, महेश मळगे, अधिव्याख्याता भापकर , विलास सिंदगीकर, विश्वनाथ मुडपे , चंद्रशेखर कळसे, विजय चव्हाण, तंगावार , ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, विजयकुमार बैले, कपिल बिरादार, मोहन तेलंगे, शिवकुमार गुळवे, नागनाथ स्वामी, विवेकानंद मठपती, जयप्रकाश हराळे, सौ अर्चना माने, बसवेश्वर थोटे, अनिता खडके, अरुणा कांदे आदिसह अनेक मान्यवरांनी कलादालनास भेट देऊन कौतुकास्पद अभिप्राय व शुभेच्छा दिल्या.
सदरील प्रदर्शनात प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे,प्रसिद्ध चित्रकार प्रशांत सोळुंके, ग्राफिक्स डिझायनर शिवाजी हांडे लातूर,विनोद गरड कन्नड,दीपक सोनवणे संभाजीनगर, सोनम भामरे संभाजीनगर, लीलाधर पाचपोळे,पुर्वा बेथारिया संभाजीनगर,मनिषा घट्टे गंगापूर, स्वाता बोडखे पैठण,अनिलराज पाटील जळगाव, दीपक जगताप मोरगाव, पद्मा कळसकर वैजापूर, पद्माकर कोळी जळगाव, दगडू रणखांब लातूर,राजाभाऊ बनाळे लातूर, भगवान पेनुरकर परभणी, नाथाजी लोंढे सोलापूर,अमित परतवाड, ज्ञानेश्वर बेंबडे, तुळशीराम जाधव, प्रताप कोरे, संजय खोचरे, गुरुदत्त महामुनी, बालाजी सैना, अनुश्री सूर्यवंशी, दीपक हालकंचे, विनय बागडे,शितल डोनगापुरे, मच्छिंद्र भोई, रंणजीत वर्मा नांदेड, दिलीप दारव्हेकर हिंगोली, सलीम आत्तार कन्नड,ज्ञानेश्वर इस्तापे कन्नड, काशिनाथ गावित वैजापूर, वैशाली जायभाये संभाजीनगर,भारती भगत पुणे, शिवार्थ दारव्हेकर,विश्वब्रम्ह विरभद्र सगरोळी, आडेप दत्तात्रय गंगापूर,चंद्रदीप नादरगे,मनिषा कुलकर्णी जळगाव,गणेश कवळासे चाळीसगाव,दिपक सोनवणे कन्नड,नंदकुमार ओतारी,चामले जयमाला उदगीर महादेव खळुरे आदि कलावंतांनी चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवला होता.
सृजन रंगकर्मी दालनाच्या सजावटीसाठी दीपक हालकंचे, चंद्रदीप नादरगे, हनुमंत हेळगिरे, विनय कोरे, बालाजी पांचाळ,महादेव खळुरे यांनी परिश्रम घेतले.दालनास भेटी दिलेल्या सर्व रसीक बांधवांचे,कलावंताचे ऋण व्यक्त करुन संयोजकांने आभार मानले.
